Monika Shinde
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे, त्यामुळे हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. यंदा, म्हणजेच ३० मार्च २०२५ रोजी रविवारी, चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा होणार आहे.
या दिवशी सर्व घरांमध्ये सकाळी लवकर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्ष यशस्वी होवो, आणि यशाची गुढी सदैव उंच राहो, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.
या दिवशी जसे गुढी उभारणे आणि उतरवणे विधीवत महत्त्वाचे आहे, तसेच गुढी उतरवताना काय करावे हे देखील महत्त्वाचे आहे. आपण गुढी कशी उतरवायची, हे जाणून घ्या.
सकाळी गुढी उभारल्यानंतर, संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवणे गरजेचे असते. यावर्षी सायंकाळी 06:37 ते 07:00 या वेळेत गुढी उतरवण्याचा मुहूर्त आहे.
गुढी उतरवताना सकाळी जसे विधीवत पूजा केली जाते, तसेच सायंकाळी गोड नैवेद्य दाखवून, आरती करून गुढी उतरवावी.
गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज घरातील स्त्रिया वापरू शकतात. गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असल्यास, ते मंदिरात दान करावीत.