अँजिओप्लास्टी कधी करावी? डॉक्टरांनी सांगितल्यानंतर लगेच की... जाणून घ्या तज्ञांचं मत

Vrushal Karmarkar

अँजिओप्लास्टी

अँजिओप्लास्टी ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेद्वारे रक्तवाहिन्या रुंद केल्या जातात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. हे अनेक नावांनी ओळखले जाते.

Angioplasty | ESakal

रक्ताच्या गुठळ्या तयार

अनेक प्रसंगी, लोक ⁠अँजिओप्लास्टीला बायपास सर्जरी आणि बलून अँजिओप्लास्टी देखील म्हणतात. उपचाराच्या या तंत्राने हृदयाच्या सर्व समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. तर रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

Angioplasty | ESakal

लक्षणं

त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे, घाम येणे असे प्रकार होतात. अशा परिस्थितीत रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते. तुम्ही निष्काळजी असाल तर ते धोकादायक ठरते. डॉक्टर अँजिओप्लास्टीद्वारे उपचार देतात. यामुळे रुग्णाला तात्काळ आराम मिळतो.

Angioplasty | ESakal

⁠अँजिओप्लास्टी कधी करावी?

मात्र ⁠अँजिओप्लास्टी कधी करावी? हा प्रश्न सर्वांना पडतो. याबाबत आता ह्रदयरोग तज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी माहिती दिली आहे. तर जाणून घ्या नेमकी ⁠अँजिओप्लास्टी करण्याची खरी वेळ कधी असते?

Angioplasty | ESakal

निकष ठरलेले आहेत

अँजिओप्लास्टी कधी करावी? यासाठी अमेरिकेत निकष ठरलेले आहेत. त्या निकषांमध्ये राहूनच डॉक्टर किंवा रुग्णालयाला अँजिओप्लास्टी करावी लागते.

Angioplasty | ESakal

अँजिओप्लास्टीसाठी निकष

भारतात मात्र असे कोणतेही निकष किंवा नियम नाहीत. त्यामुळे डॉक्टर किंवा हॉस्पिटल सांगेल त्याप्रमाणेच रुग्णांना अँजिओप्लास्टीचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे भारतात अँजिओप्लास्टीसाठी निकष आणि नियम ठरवण्याची वेळ आलेली आहे.

Angioplasty | ESakal

सेकंड ओपिनियन⁠

रुग्णालय ⁠अँजिओप्लास्टी करायला सांगितल्यास रुग्णाने सेकंड ओपिनियन घ्यावे. त्यानंतरच ⁠अँजिओप्लास्टीचा निर्णय घ्यावा. सेकंड ओपिनियन हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याचा रुग्णांनी वापर करावा, असं तज्ञांचं म्हणंण आहे.

Angioplasty | ESakal

अँजिओप्लास्टी करण्याची गरज

रुग्णाच्या हृदयात 70 ते 75 टक्के पेक्षा कमी ब्लॉकेजेस असतील तर अँजिओप्लास्टी करण्याची गरज नाही. 90% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतील तर मात्र ⁠अँजिओप्लास्टी तात्काळ करावी लागते. अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा लागतो.

Angioplasty | ESakal

डॉक्टरांचं मत

रुग्णांना 90% पेक्षा कमी असतील तर त्यांना ⁠अँजिओप्लास्टी करण्याआधी काही दिवसांचा वेळ असतो. यावेळेत रुग्णांनी सेकंड ओपिनियन घेऊन अँजिओप्लास्टीचा निर्णय घ्यावा, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Angioplasty | ESakal