Saisimran Ghashi
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण भारतात आजही रावणाचे वंशज आहेत.
राजस्थानमधील जोधपूर येथील श्रीमाळी ब्राह्मण रावणाला आपला पूर्वज मानतात आणि स्वतःला त्याचे वंशज मानतात.
जोधपूरमधील किला रोडवरील एका मंदिरात रावण व मंदोदरीच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण भारतात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते, मात्र श्रीमाळी ब्राह्मण या दिवशी शोक व्यक्त करतात.
रावणाच्या दहनाच्या दिवशी सर्व पंथीय स्नान करतात, पुरुष नवीन पवित्र धागा घालतात आणि रावणाची व शिवाची पूजा करतात.
या मंदिरात दररोज रावणाची आणि देवी मंदोदरीची पूजा होते. रावणाच्या पत्नी मंदोदरीचीही विशेष पूजन विधीने पूजा केली जाते आणि प्रसाद वाटला जातो.
मंदोदरी मायासुर व अप्सरा हेमाची कन्या होती आणि तिचा विवाह रावणाशी झाला होता.
मंदोदरीच्या विवाहासाठी आलेले लंकेचे गौध गोत्राचे काही लोक विवाहानंतर जोधपूरजवळ स्थायिक झाले, जे आज रावणाचे वंशज मानले जातात.
श्रीमाळी गोध ब्राह्मण या दिवशी रावणाच्या मृत्यूचा शोक पाळतात, कारण तो त्यांच्या मते तो विद्वान होता आणि त्यांचा पूर्वज होता.
या समाजाने रावणाच्या स्मृतीप्रित्यर्थ मंदिर बांधले असून, त्यांच्या परंपरा आजही जिवंत ठेवल्या जात आहेत.
याबद्दल अधिक पुरावे आढळले नाहीत; परंतु पौराणिक संदर्भ आणि धार्मिक भावनेतून ते लोक स्वतःला रावणाचे वंशज मानतात.