Saisimran Ghashi
नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मावळे होते.
कोंढाणा किल्ल्याची लढाई आणि महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द गड आला, पण सिंह गेला! हा इतिहास आपण जाणतो
तानाजी मालुसरे यांचे 12 वे वंशज शिवराज मालुसरे हे आहेत.
काळोजी (तानाजी मालुसरे यांचे वडील)-तानाजी-रायबा-मुंबाजी- येसाजी-सूर्याजी-येसाजी-अप्पाजी-बलवंतराव-नारायणराव-बाळकृष्ण-शिवराज मालुसरे
शिवराज मालुसरे यांचा मुलगा रायबा मालुसरे हा तान्हाजींचा थेट 13वा वंशज आहे.
तानाजी मालुसरे आणि शेलार मामा १५० मावळ्यांच्या एका तुकडीसह कोंढाणा किल्ल्याच्या सर्वात उंच बाजूने ( तानाजींच्या स्मृतीमध्ये तान्हाजी कडा किंवा कडा म्हणून नाव देण्यात आले असल्याने ) वर चढले.
युद्ध झाल्यावर मराठ्यांचा विजय ध्वज फडकवल्यानंतर, महाराजांचे शूर मावळे तानाजीच्या पार्थिवासह पालखीतून राजगडावर परतले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींच्या शौर्याला श्रद्धांजली वाहिली आणि शहीदांच्या पार्थिवावर त्यांची राजमाळ घातली.
350 वर्षांपूर्वीची महाराजांचा स्पर्श झालेली ही राजमाळ आणि सनद आजही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडे आहे.