Amit Ujagare (अमित उजागरे)
तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक ऐतिहासिक बंगला आहे. हा बंगला आजही संविधान निर्मितीच्या आठवणी जपतो!
हा बंगला पुण्यातून फक्त ३० किमी दूर तळेगाव दाभाडे येथे आहे. पुणे-मुंबई महामार्गाजवळची ही एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच बंगल्यात राहून संविधानाचा मसुदा आणि इतर महत्त्वाची कामे केली.
बाबासाहेबांनी या बंगल्यासोबत मोठी जमीन विद्यापीठासाठी घेतली होती.
१९५६ मध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर हा बंगला दुर्लक्षित झाला. २००४ साली एका स्मारक समितीने तो संरक्षित करण्याचा निर्णय घेतला.
बंगल्याची मालकी सिद्ध करण्यासाठी किसन थूल यांनी आठ वर्षे कागदपत्रांचा शोध घेतला आणि खूप प्रयत्न केले.
२०१२ मध्ये हा बंगला सरकारच्या ताब्यात आला. त्यानंतर जनतेच्या मदतीने (crowd-funding) त्याची दुरुस्ती करण्यात आली.
आज या बंगल्यात बाबासाहेबांचा टेबल, कपाट, थायलंडहून मिळालेली बुद्धाची मूर्ती, तसेच बाबासाहेब व रमाबाईंचा पुतळा आहे.