Vrushal Karmarkar
जेव्हा मुघल भारतात आले आणि त्यांनी येथील आंबे चाखले तेव्हा ते त्याचे चाहते बनले. पण त्यांना काही विशिष्ट ठिकाणचे आंबे आवडले.
मुघलांना आंबे इतके आवडायचे की त्यांनी त्यांच्या सल्तनतमध्ये आंब्याच्या बागा विकसित केल्या. परंतु मागणी टिकवून ठेवण्यासाठी सल्तनतच्या बाहेरूनही आंबे आयात केले जात होते.
मुघलांचे आवडते आंबे लखनौ आणि फैजाबाद येथून येत असत. त्या काळात हा प्रदेश अवध म्हणून ओळखला जात असे. मुघलांना येथे पिकवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या आंब्यांची विशेष आवड होती.
मुघल काळातही पश्चिम बंगालमधील मालदा आंब्यांसाठी प्रसिद्ध होते. येथून येणारे आंबे आग्रा आणि दिल्लीच्या दरबारात पोहोचत असत.
आंबे सर्वात जास्त आवडणाऱ्या मुघल सम्राटांमध्ये अकबर, औरंगजेब आणि शाहजहान यांचा समावेश होता. अकबराचे नाव इतिहासात विशेषतः नोंदवले गेले आहे.
अकबराला आंबे किती आवडत होते हे बिहारमधील दरभंगाजवळील लक्ष्मीबाग येथे सम्राटाने १ लाख आंब्याची रोपे लावली होती यावरून समजते.
मुघलांच्या शाही बागेत लावलेल्या आंब्याच्या रोपांची विशेष काळजी घेतली जात असे. येथील आंबे राजाला वाढले जात होते.
फेमस काश्मिरी पंडीत चेहरे कोण?