Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट कापल्यानंतर शाहिस्तेखान नेमका कुठे पळाला, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल.
शाहिस्तेखान तीन वर्षे पुण्यात तळ ठोकून बसला होता, शिवाजी महाराजांनी त्याला धडा शिकवला तेव्हा तो चौसष्ट वर्षांचा होता.
शाहिस्तेखान येथील जनतेला छळत होता. जनतेची पिळवणूक करत होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ एप्रिल, १६६३ रोजी, रविवारी रात्री, शाहीस्तेखानाच्या पुण्यातील निवासस्थानी—लाल महालावर—निवडक सहकाऱ्यांसह हल्ला करून त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला.
मराठ्यांच्या सैन्याने लाल महालात शिरून समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा पराभव केला.
शिवाजी महाराजांनी तलवारीने वार करून शाहिस्तेखानाच्या हाताची तीन बोटे उडवली.
पण अंधाराचा लाभ घेत तो बाहेर पळाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शाहिस्तेखान लपून राहिला.
संकट टळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला स्वतःची लाज वाटू लागली. मराठ्यांनी त्याचा जबरदस्त अपमान केला होता.
त्यामुळे तीन वर्षे पुण्यात ठाण मांडून बसलेला शाहिस्तेखान ८ एप्रिल १६६३ रोजी पुण्यातून निघाला आणि थेट औरंगाबादला गेला. त्यानंतर त्याने पुण्याकडे परत वळण्याचं धाडस केले नाही.
मिर्झा अबू तालिब हे शाहिस्तेखानाचे मूळ नाव होते, तर "शाहिस्तेखान" ही त्याला दिलेली पदवी होती. तो औरंगजेबाचा मामा होता.
शिवाजी महाराजांनी बोटे छाटल्यानंतर औरंगजेब बादशाह प्रचंड संतापला होता, कारण त्याला हा अपमान स्वतःचाही वाटला.
औरंगजेबाने शाहिस्तेखानाची तडकाफडकी बदली करून त्याला बंगालचा सुभेदार नेमले. १६६४ साली तो ढाक्याचा सुभेदार म्हणून रुजू झाला आणि तिथे त्याने आपली कर्तबगारी सिद्ध केली.
आजचे ढाका शहर शाहिस्तेखान यांनी वसवले आहे. त्यांनी अनेक इमारती बांधल्या आणि अन्नाच्या किमती कमी केल्या.
शिवरायांनी शिकवलेला धडा त्याने आयुष्यभर जपला. पुढे तो लोककल्याणासाठी कार्यरत राहिला. नंतर तो दिल्लीत गेला आणि १६९४ मध्ये त्याचे निधन झाले.