संतोष कानडे
आजकाल अनेकांच्या तोंडात छपरी शब्द येतो. एखाद्यावर राग व्यक्त करायचा असेल वा त्याच्यावर टीका करायची असेल तर छपरी म्हटलं जातं.
परंतु हा शब्द एका समूदायावरुन आलेला आहे. छप्परबंद नावाचा एक समूदाय आहे. हे लोक झोपडीमध्ये रहायचे.
मुघल सेनेसोबत येऊन या लोकांनी छपरं उभी करण्यास सुरुवात केली. झाडांच्या काड्यांपासून बनवलेली ही तात्पुरती छपरं होती.
पुढे पेगवानांकडून या लोकांना पुण्यात वसवण्यात आलं. त्यानंतर या वसाहतीला छप्परबंद लेन म्हटलं गेलं.
ब्रिटिशांच्या काळात छप्परबंद समूदायाला अनेक खोट्या प्रकरणांमध्ये बदनाम केलं केलं. जसं की, नकली शिक्क्यांचं प्रकरण.
या समूदायाला क्रिमिनल ट्राईब अॅक्टनुसार जन्मजात अपराधी घोषित केलं.
आता हे लोक भारतातील डी नोटिफाईड ट्राईब्समध्ये येतात. छप्परबंद समूदायातील लोकं छतांवर छप्पर टाकण्याचं काम करतात.
छप्पर शब्दाचा अर्थ छत असा होतो. आणि फारसीमध्ये बंद शब्दाचा अर्थ बांधणारा किंवा बनवणारा असा होतो.
बांबू, घास यापासून हे लोक घरांवर छप्पर बनवत असत. हे लोक मुघल साम्राज्यातील सेनेमध्ये रजपूत सैनिक असल्याचा दावा करायचे.
हे लोक काठियावाड आणि राजस्थानातून आलेले आहेत. विशेषतः उत्तर पश्चिम, कर्नाटक, विजापूर, धारवाड आणि बेलगाम जिल्ह्यात हे लोक आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात छप्परबंद समाजाच्या लोकांची संख्या अधिक आहे.
अनेक वर्षे हे लोक भूमिहीन होतं. परंतु कालांतराने त्यांनी जमिनी मिळाल्या. आजचा छपरी हा शब्द या समूदायाच्या नावावरुन आल्याचं सांगितलं जातं.