Monika Shinde
होळीच्या दिवशी महिलांद्वारे पुरुषांना काठीने मारून होळी साजरी केली जाते.
लठमार होळी भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावन आणि बरसाना या ठिकाणी साजरी केली जाणारी एक खास होळी आहे.
याची कथा भगवान श्री कृष्ण आणि राधा यांच्यातील होळी खेळण्याच्या प्रेमकथेशी जोडली आहे.
भगवान श्री कृष्ण आणि त्यांचे मित्र गोकुलात असताना राधा आणि तिच्या सहलींनी त्यांना होळी खेळताना लठीने मारले. याच परंपरेचा पुढे उत्सव सुरू झाला.
या दिवशी गावभर रंगांची उधळण, गोंधळ, वादन, गाणी आणि महिलांच्या लठीने मारण्याचे दृश्य दिसते.
लठमार होळी राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक असून या दिवशी रंग, संगीत आणि आनंदाने एकत्र येऊन उत्सव साजरा केला जातो.