झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

Saisimran Ghashi

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी एक अत्यंत वीर वीरांगना होत्या. ज्या 1857 च्या भारतीय विद्रोहात सहभागी होऊन ब्रिटिशांविरोधात लढल्या आणि शाहिद झाल्या.

rani laxmibai history | esakal

दत्तक पुत्र दामोदर राव

राणी लक्ष्मीबाईंनी दामोदर राव यांना दत्तक घेतले, जे त्यांचे उत्तराधिकारी बनले. त्यांच्या वंशजांनी पुढे अज्ञात आणि संघर्षपूर्ण जीवन जगले.

damodar rao newalkar history | esakal

वंशजांचा अज्ञातवास

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या अज्ञातवास आणि गरीबीमध्ये जीवन व्यतीत केले.

rani lakshmibai descendants now | esakal

इंदूरमध्ये जीवन

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांनी इंदूरमध्ये अत्यंत गरिबीत आणि भाड्याच्या घरात जीवन व्यतीत केले. पहिल्या दोन पिढ्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन गरीबीमध्ये घालवले.

rani lakshmibai descendants indore | esakal

दामोदर राव यांची स्थिती

दामोदर राव आणि त्याच्या पिढ्यांनी इंदूरमधील भाड्याच्या घरात अत्यंत कष्टकरी जीवन व्यतीत केले. त्यांचा मुलगा लक्ष्मण राव झांसीवाले यांना ब्रिटिशांनी दरमहा २०० रुपये पेन्शन दिली.

rani laxmibai descendants nagpur | esakal

कृष्ण राव यांचे आयुष्य

राणी लक्ष्मीबाईंचे पणतू कृष्ण राव झांसीवाले इंदूरमधील हुकुमचंद मिलमध्ये स्टेनो-टायपिस्ट म्हणून काम करत होते.

rani laxmibai descendants krushnarao | esakal

वंशाजांची आजची स्थिती

राणी लक्ष्मीबाईंच्या सहाव्या पिढीतील वंशज आजही अज्ञात जीवन जगत आहेत, ज्यात योगेश अरुण राव झांसीवाले सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांसह नागपूरमध्ये राहतात.

rani laxmibai descendants life now | esakal

सरकारची उदासीनता

ब्रिटीश राजवटीपासून आजच्या काळापर्यंत राणींच्या वंशजांचा वारसा फारसा ओळखला गेला नाही आणि त्यांना मदतीसाठी काहीही दिले गेले नाही.

rani laxmibai descendants situation today | esakal

राणींच्या वंशजांना पेन्शन

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांना एकेकाळी पेन्शन मिळत होती, पण स्वातंत्र्यानंतर ती बंद करण्यात आली.

rani laxmibai descendants history | esakal

100 वर्षांपूर्वी भारतीय महिलांचे जीवन कसे होते? 10 दुर्मिळ फोटो नक्की पाहा

Indian Women life Old Photos | esakal
येथे क्लिक करा