Aarti Badade
वडाळे तलावाजवळ वसलेले विठ्ठल रखुमाई मंदिर – समृद्ध इतिहास आणि भक्तीचा केंद्रबिंदू!
पुरातन काळात संत प्रवृत्तीचे रोडे बुवा यांनी या मंदिराची स्थापना केली होती.
मंदिराजवळचा बाजार आजही प्रसिद्ध आहे. पूर्वी येथे संत तुकाराम महाराज मिरची विकायचे!
व्यापार संपल्यावर तुकाराम महाराज याच झाडाखाली पारायणात मग्न होत असत.
परमार्थात एवढे रममाण की, कोण वस्तू घेऊन गेला याचेही भान राहत नसे!
संपूर्ण गाव एकत्र येतो विठ्ठलाच्या अभिषेक, भजन, कीर्तनासाठी!
नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि गोकुळाष्टमीही इथे भक्तिभावाने साजरी होते.
पनवेल महापालिकेने मिरची विकणाऱ्या तुकाराम महाराजांचे सुंदर शिल्प उभारले आहे.
मंदिरातील मूर्ती अति प्राचीन, काळ्या पाषाणातील उत्कृष्ट शिल्पकलेचे प्रतीक!