Vrushal Karmarkar
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले. ही कारवाई भारतीय सैन्याने ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत केली.
अशा परिस्थितीत, देशातील कोणत्या कंपन्या भारतीय सैन्यासाठी शस्त्रे बनवतात ते जाणून घेऊया.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ही भारत सरकारची प्रमुख संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे. जी विविध क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि संरक्षण प्रणाली विकसित करते.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. जी लष्करासाठी क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण उपकरणे तयार करते.
ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड ही एक संयुक्त उपक्रम कंपनी आहे जी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बनवते. हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
टाटा समूहाच्या काही कंपन्या संरक्षण क्षेत्रात काम करतात. लॉकहीड मार्टिन सारख्या परदेशी कंपन्यांसोबत भागीदारीत काम करत आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BDL) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे जी संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर संरक्षण उपकरणे तयार करते.
दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणाऱ्या 'हॅमर क्षेपणास्त्रा'ची किंमत आणि वैशिष्ट्ये काय?