Vrushal Karmarkar
सोशल मीडियाच्या युगात कोणता ट्रेंड कधी ट्रेंड होईल हे कोणीच सांगू शकत नाही. असाच एक ट्रेंड सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
लोक त्या ट्रेंडनुसार सतत व्हिडिओ बनवत आहेत. ते इंटरनेटवर अपलोड करत आहेत. 'टॉर्च अँड हळद' नावाने हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ट्रेंडनुसार, लोक एका अंधाऱ्या खोलीत पाण्याने भरलेला एक साधा ग्लास घेतात आणि तो त्यांच्या मोबाईलच्या टॉर्च लाईटवर ठेवतात.
यानंतर, ग्लासमध्ये एक चमचा हळद टाकली जाते. त्यानंतर एक जादुई दृश्य सुरू होते. जे लोकांना स्तब्ध करते.
हळद काचेच्या आत पडताच ती प्रकाशाशी आदळते. एक अतिशय सुंदर सोनेरी प्रकाश आणि धुरासारखा परिणाम देते. याला "मॅजिकल स्प्लॅश" ट्रेंड म्हणूनही ओळखले जाते.
सोशल मीडियावर लोक या ट्रेंडला वेगाने फॉलो करत आहेत आणि वेगाने रील आणि व्हिडिओ बनवत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व वयोगटातील लोक दिसतील.
मात्र तुम्हाला माहिती आहे का, हा ट्रेंड सर्वात पहिला कुणी केला? त्या कंटेंट क्रिएटरचं नाव काय? तर याचं नाव आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हा ट्रेंड सर्वप्रथम जेफ आणि लिझ रिचर्ड्स यांनी सुरू केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेज लिझ रिचर्ड्स डेली ओरिजिनल व्हिडीजवर सुरू केला होता. त्यानंतर हा व्हायरल झाला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते. जे प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. यामुळे पाण्यात एक रंग तयार होतो.
एका ढगामध्ये किती पाणी असते?