Vrushal Karmarkar
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.
अतुल परचुरे यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही लोकांचे भरपूर मनोरंजन केले. तसेच त्यांनी नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
अतुल परचुरे यांनी नवरा माझा नवसाचा, सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप आणि ब्रेव्ह हार्ट या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्का, प्रियतमा, वसु चि सासू, आम्ही आणि आमचे बाप, वाह गुरु!, असा मी असा मी,कापूस कोंड्याची गोष्ट या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अतुल परचुरे यांनी मराठी मालिकांमध्ये ठसा उमटवला आहे. त्यांनी होणार सून मी या घरची, जागो मोहन प्यारे , भागो मोहन प्यारे , अळी मिळी गुपचिळी, माझा होशील ना या मालिकांमध्ये काम केले आहे.
तसेच आरके लक्ष्मण की दुनिया , कॉमेडी नाइट्स विथ कपिल , कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस के अजूबे, भी से भदे, बडी दूर से आये है, यम हैं हम या हिंदी मालिका आणि शोमध्ये काम केले आहे.
अतुल परचुरे हे नियम रंजन या तेलगू चित्रपटातही दिसले होते.
वाचा सविस्तर...