Saisimran Ghashi
आपण नेहमी लगेच बनवलेले गरम गरम अन्न पदार्थ खात नाही.
जेवताना काही पदार्थ गरम करून घेतो मग खातो.
पण काही अन्न पदार्थ पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
पालकची भाजी किंवा आमटी कधीच गरम करून खावू नये.
उकडलेली अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्यास अन्नजन्य आजाराचा धोका वाढतो
मशरूम पुन्हा गरम करून खालल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
एकदा बनवलेला चहा पुन्हा गरम करून पिऊ नये, याने फूड पॉइजनिंग होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.