Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींविषयी ठोस पुरावे मिळालेले नाही, पण इतिहासात "तीन तलवारी" असल्याची माहिती आहे. त्यात एक तलवार आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, जी संभाजी महाराज व इंद्रजित सावंत यांनी सुरक्षित ठेवली आहे.
एक महत्त्वाची तलवार "जगदंबा तलवार" म्हणून ओळखली जाते. सध्या ही तलवार लंडनमध्ये आहे. २०२४ पर्यंत ती भारतात परत आणली जाणार होती, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी होती.
ऑक्टोबर 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज चौथे होते. त्यावेळी एक जुनी तलवार प्रिन्सला भेट म्हणून देण्यात आली.
करवीरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन दिवाण महादेव बर्वे यांनी ब्रिटिश प्रिन्सला "जगदंबा तलवार" भेट दिली.
भेट म्हणून दिलेल्या तलवारीची नोंद "Catalogue of the collection of Indian arms and objects of art" कॅटलॉगमध्ये केली गेली. यात स्पष्टपणे नमूद आहे की ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
जगदंबा तलवार सध्या लंडनमधील Marlborough House मध्ये ठेवलेली आहे, आणि त्याला "Case of Arms" मध्ये स्थान दिले आहे. कॅटलॉगमध्ये 2 वेळा या तलवारीला "शिवाजी महाराजांची तलवार" म्हणून उल्लेखित केले आहे.
तलवार "जगदंबा" म्हणून ओळखली जाते. त्यावर सोन्याचे काम केलेले आहे आणि तिची लांबी 121 सेंटीमीटर (4 फूट) आहे. तलवार रत्नजडित असून, वजन कमी आहे.
कागदपत्रांमध्ये "जगदंबा" तलवारीविषयी अजून भरपूर तपशील दिला आहे, ज्यात हिरे आणि माणके यांचा उल्लेख केला आहे. त्यात 6 हिरे, 44 माणके, आणि 13 पराज हिरे यांचा समावेश आहे.
बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळात भारतात ही तलवार आणण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. पण दुर्भाग्यवश त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
राणीच्या बकिंगहॅम पॅलेस इस्टेटमध्ये स्थित जगदंबा तलवारवर आंतरराष्ट्रीय कायदे लागू होतात. ज्यामुळे ती भारतात परत आणणे अवघड आहे.