कोणते ‘Vitamin’ कॅन्सरचा धोका कमी करते?

Aarti Badade

कॅन्सरचे वाढते रुग्ण

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे जगभरात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत असताना, कॅनडातील वॉटरलू विद्यापीठाने 'व्हिटॅमिन सी'बाबत एक मोठा सकारात्मक दावा केला आहे.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका

'जर्नल ऑफ थिअरेटिकल बायोलॉजी'मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारे 'व्हिटॅमिन सी' पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सरचा धोका कमी करू शकते.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

अन्नातील घातक घटक

बेकन किंवा सलामीसारख्या प्रक्रियेत (Processed Food) वापरल्या जाणाऱ्या मांसातील नायट्रेट्स आणि नायट्राइट्समुळे पोटात होणाऱ्या कॅन्सरजनक रासायनिक प्रक्रियांना व्हिटॅमिन सी रोखते.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

'नायट्रोसेशन' प्रक्रिया

अन्नातील काही घटकांमुळे पोटात 'नायट्रोसेशन' नावाची प्रक्रिया होऊन कॅन्सर वाढवणारी संयुगे तयार होतात, परंतु व्हिटॅमिन सी या घातक संयुगांची निर्मिती रोखण्यास मदत करते.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

व्हिटॅमिन सी?

व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व असून ते मानवी शरीरात स्वतःहून तयार होत नाही, त्यामुळे संत्री, मोसंबी, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांतून ते मिळवणे गरजेचे असते.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

पालकसारख्या पालेभाज्या

पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन सी' आणि 'नायट्रेट' दोन्ही नैसर्गिकरित्या एकत्र असल्याने, त्यांच्या नियमित सेवनाने कॅन्सरचा धोका झपाट्याने कमी होऊ शकतो.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

जेवणानंतर

संशोधकांनुसार, प्रत्येक जेवणानंतर व्हिटॅमिन सी युक्त फळे किंवा सप्लिमेंट्स घेतल्यास प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे शरीराला निर्माण होणारा संभाव्य धोका काही प्रमाणात नक्कीच कमी होतो.

Vitamin C Cancer Prevention

|

Sakal

एका सिगारेटमुळे आयुष्य किती मिनिटांनी कमी होते?

minutes of life lost per cigarette

|

Sakal

येथे क्लिक करा