Saisimran Ghashi
स्वतःला पांडवांचे वंशज मानणारा एक समाज आहे त्यांच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील सेहरा गावात रज्जड समाजाचे लोक काट्यावर झोपण्याची प्रथा पाळतात.
ही प्रथा मार्गशीर्ष महिन्यात होणाऱ्या सणाचा भाग आहे.
रज्जड समाजाने स्वतःला पांडवांचे वंशज मानले आहे.
काट्यावर झोपण्याची परंपरा एक सत्वपरीक्षेसारखी आहे, जिथे लोक आपली शुद्धता तपासतात.
या प्रथेचे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ज्यात नहाल समाजाच्या व्यक्तीने पांडवांना जंगलात पाणी शोधून दिले.
पण या बदल्यात नहालने पांडवांपुढे एक अट ठेवली होती, ज्यात बहिणीचे लग्न त्याच्याशी लावावे लागेल.
पांडवांनी भोंदई नावाच्या मुलीला बहिण मानले आणि तिचे लग्न नहालशी केले.
बहिणीला निरोप देताना पांडवांनी काट्यावर झोपून सत्यतेची परीक्षा दिली.
त्यामुळे रज्जड समाजाचे लोक स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून घेतात आणि काट्यावर पडून परीक्षा घेतात.
पुणे जिल्ह्यातील गुळुंजे गावात सुद्धा अशी काट्यावर उडी मारण्याची परंपरा आहे.