Pranali Kodre
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा काळ अस्मानी आणि सुलतानी संकटांनी भरलेला होता. रयत त्रस्त होती, आणि शहाजी महाराजांवरही मोठे संकट होते.
निजामाने जिजाऊंच्या वडिलांची आणि भावाची भर दरबारात हत्या केली. त्या वेळी जिजाऊ गरोदर होत्या, आणि त्यांच्या सुरक्षेसाठी शहाजी महाराजांनी त्यांना शिवनेरी गडावर पाठवले.
शिवनेरीचा किल्लेदार राजा विश्वासराव यांच्याशी भोसले घराण्याचे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्याच कुटुंबातील जयंतीबाई या शिवाजी महाराजांच्या वहिनी होत्या.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर जिजाऊंच्या पोटी पुत्ररत्न झाले. त्यावेळी उमाबाई, दुर्गाबाई आणि जयंतीबाई उपस्थित होत्या.
बालकाचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवण्यात आले. हे नाव शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून ठेवले गेले.
शहाजी महाराजांच्या आई उमाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. त्यांचे कुलदैवत भगवान शंकर-पार्वती होते, त्यामुळे ‘शिव’ नाव ठेवण्यात आले.
आई जिजाऊ आपल्या पुत्रास ‘शिऊबा’ या लाडक्या नावाने हाक मारत असत.
भगवान शिवाच्या नावावरून ठेवलेले ‘शिवाजी’ हे नाव अखंड हिंदवी स्वराज्याचे प्रतीक बनले. त्यांच्या पराक्रमामुळे हे नाव अजरामर झाले!