Shubham Banubakode
आयपीएलचा १८ वा हंगाम सध्या सुरु असून आतापर्यंत ३० पेक्षा जास्त सामने झाले आहे.
या सामन्यांत आतापर्यंत फलंदाजांचा दबदबा राहिला आहे. फलंदाजांकडून जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली आहे.
अभिषेक शर्मा असो किंवा निकोलस पूरन यांनी चौकार षटाकारांची आतिषबाजी करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
पण आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू कोण? तुम्हाला माहिती का?
विराट कोहलीने बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम सर्वाधिक 130 षटकार लगावले आहेत.
ख्रिस गेलने बंगळुरू चिन्नास्वामी स्टेडियमवर 127 षटकार लगावले असून तो कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 102 षटकार लगावले आहेत.
कीरोन पोलार्डने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 85 षटकार लगावले आहेत.
आंद्रे रसेलने कोलकातातील ईडन गार्डन्सवर 84 षटकार लगावले आहेत.