जगातील पहिले एटीएम कुठे बसवले? ATMच्या शोधाची कल्पना कशी सुचली?

Mansi Khambe

एटीएम मशीन

लोकांसाठी एटीएम हे एक अतिशय महत्त्वाचे मशीन आहे. मात्र आज डिजिटल पेमेंटच्या युगात एटीएमची गरज कमी झाली आहे. परंतु जेव्हा डिजिटल युग नव्हते तेव्हा एटीएम खूप उपयुक्त गोष्ट होती.

world's first ATM | ESakal

इतिहास

पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील पहिले एटीएम मशीन कधी आणि कुठे बसवण्यात आले होते. तसेच त्याचा शोध कसा लागला हे जाणून घ्या.

world's first ATM | ESakal

पहिले एटीएम

जगातील पहिले एटीएम २७ जून १९६७ रोजी लंडनमधील एनफिल्ड परिसरात सुरू झाले. आता त्याला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील हे पहिले एटीएम बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर बसवण्यात आले होते.

world's first ATM | ESakal

शोधकर्ता

या यंत्राचा शोधकर्ता जॉन शेफर्ड-बॅरन मानला जातो. कारण बॅरन बँकेत पैसे काढण्यासाठी जायचा तेव्हा तिथे खूप लांब रांग असायची. शनिवारी बँक बंद असताना अनेकदा पैसे काढता येत नव्हते, त्यामुळे त्यांना हे मशीन बनवण्याची कल्पना सुचली.

world's first ATM | ESakal

कल्पना

जॉन शेफर्ड-बॅरनला चॉकलेट वेंडिंग मशीन चॉकलेट वितरीत करू शकते, तर मग असे मशीन का बनवू नये जे पैसे देखील देऊ शकते, अशी कल्पना सुचली. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ATM मशीन बनवले.

world's first ATM | ESakal

पहिले एटीएम

सर्वात पहिले एटीएम मशीन लंडनमध्ये बसवण्यात आले. बार्कलेज बँकेच्या शाखेत बसवलेले हे एटीएम २०१७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोन्याचे बनवण्यात आले होते.

world's first ATM | ESakal

पिन कोड

जॉन शेफर्डने सुरुवातीला या एटीएम मशीनचा पिन सहा अंकी सेट केला होता, परंतु असे म्हटले जाते की त्यांच्या पत्नीला तो लक्षात ठेवण्यात अडचण येत होती, म्हणून त्यांनी तो चार अंकी केला.

world's first ATM | ESakal

भारतात एटीएम कधी आले

१९८७ मध्ये भारतात पहिले एटीएम सुरु झाले. एचएसबीसी म्हणजेच हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशनने मुंबईतील त्यांच्या एका शाखेत एटीएम मशीन बसवली होती.

world's first ATM | ESakal

एटीएमचे जाळे

आरबीआयच्या मते सप्टेंबर २०२० पर्यंत देशात २,३४,२४४ मशीन बसवण्यात आल्या.

world's first ATM | ESakal

सरकारी नोकरी करणारे 'हे' खेळाडू वर्षभर खेळतात क्रिकेट, पण त्यांना इतक्या सुट्ट्या कशा मिळतात?

Cricketer Government Job | Esakal
येथे क्लिक करा