Shubham Banubakode
झंडू बाम, झंडू बाम... पीडहरी बाम... ही जाहिरात ऐकली की आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात.
आजही आपण डोकं किंवा अंग दुखत असेल, तर झंडू बामचा वापर करतो.
८०-९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेलं झंडू बाम आजही तितकंच लोकप्रिय आहे.
पण या झंडू बामची सुरुवात कशी झाली आणि झंडू बाम हे नाव कसं पडलं? हे तुम्हाला माहिती का?
झंडू बामची निर्मिती वैद्य झंडू भट्ट यांनी केली होती.
झंडू भट्ट हे जामनगरच्या राजघराण्याचे वैद्य होते.
आयुर्वैदात पारंगत असलेल्या झंडू भट्ट यांना जामनगरच्या राज्याने डोकंदुखी, अंगदुखीसारख्या आजारांवर औषध निर्मितीचं काम दिलं होतं.
१८६४ मध्ये राजाने प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी झंडू भट्ट यांना आर्थिक मदतही केली होती.
पुढे याच प्रयोगशाळेत या बामची निर्मिती झाली, त्याला झंडू भट्ट यांच्या नावावरून झंडू बाम, असं नाव पडलं.
हीच प्रयोगशाळा पुढे झंडू फार्मा म्हणून ओळखळी जाऊ लागली.
२००८ मध्ये झंडू फार्मा ही कंपनी इमामी ग्रुपने विकत घेतली.
इमामी ग्रुप आज वैद्य झंडू भट्ट यांचा वारसा पुढे चालवत आहेत.