सकाळ ऑनलाईन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा विविह निश्चित झाला आहे.
काही दिवसांत त्यांचा साखरपुडा पार पडणार असून याची माहिती खुद्द आत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
पण अजित पवारांच्या सुनाबाई कोण? त्यांचं शिक्षण किती? त्या काय करतात? जाणून घेऊयात.
ऋतुजा पाटील असं या सुनबाईंचं नाव आहे. पल्लवी आणि प्रवीण पाटील या दाम्पत्याच्या त्या कन्या आहेत. पाटील कुटुंबिय हे फलटणचे रहिवासी आहेत.
ऋतुजा पाटील यांनी अमेरिकेतून डिझाईनिंगमध्ये पदवी मिळवली आहे. सध्या त्या मुंबईतील एका पीआर कंपनीत काम करतात.
त्याचबरोबर फलटणमधील 'श्रीराम बझार' या ग्रोसरी स्टोअरच्या त्या संचालक आहेत.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिवंगत हनुमंतराव पवार यांच्या त्या नात आहेत.
ऋतुजा पाटील यांचे वडील प्रवीण पाटील यांनी टाटा, आदित्य बिर्ला, रिलायन्स, हिरो या बड्या उद्योगांसह भारत सरकारसोबत महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.