कार्तिक पुजारी
ध्रुव राठी प्रसिद्ध यूट्यूबर, सोशल मीडिया अॅक्टिविस्ट आणि ब्लॉगर आहे.
यूट्यूबवर त्याला जवळपास १५ मिलियन फॉलोवर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ध्रुव जर्मनीमध्ये राहत आहे. याच ठिकाणावरुन तो राजकीय, सामाजिक आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ करत असतो.
ध्रुवने सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली होती.
२९ वर्षीय ध्रुव राठी प्रवेश: जाट समुदायातून येतो. तो मुळचा हरियाणाच्या रोहतकचा आहे. दिल्लीमध्ये त्याचे लहानपण गेले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये गेला.
ध्रुवचे लग्न २०२१ मध्ये जुलीसोबत झाले आहे. त्याने २०२२ मध्ये पुन्हा एकदा भारतीय परंपरेने जुलीसोबत लग्न केले.
फॅबसेलेबी डॉड इन या वेबसाईटच्या दाव्यानुसार, त्याची संपत्ती ७ मिलियन डॉलर म्हणजे ५८ कोटी रुपये आहे.
वेबसाईटच्या दाव्यानुसार तो यूट्यूबवर महिन्याला ४० लाख रुपये कमावतो. वार्षिक तो १२ कोटी रुपये कमावतो.