हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यास कारणीभूत ठरलेले डॉ. दीपक पवार कोण?

Amit Ujagare (अमित उजागरे)

हिंदीची सक्ती

राज्यात NEP अंतर्गत त्रिभाषा सुत्रानुसार हिंदी भाषा पहिलीपासून बंधनकारक करण्यात आली होती, याविरोधात डॉ. दीपक पवार हे आक्रमकपणे लढा देत आहेत.

Dr. Deepak Pawar

मराठीची अवस्था बिकट

हे धोरण लागू झाल्यास मराठी भाषेची स्थिती कशी बिकट होऊ शकते हे त्यांनी सप्रमाण वारंवार आपल्या मुलाखतींतून लेखांमधून मांडलं आहे.

Dr. Deepak Pawar

तथ्यांवर लढा सुरु

त्यांनी सप्रमाणं काही तथ्ये मांडल्यानंतर त्यांच्याच मुद्द्यांवर इतर सामाजिक, सांस्कृतीक आणि राजकीय संघटनांनी आक्रमकपणे मराठीची बाजू लावून धरत हिंदीला कडाडून विरोध केला.

Dr. Deepak Pawar

प्राध्यापक

डॉ. दीपक पवार हे मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. मराठी भाषेचा मुद्दा हा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या किती महत्वाचा आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं.

Dr. Deepak Pawar

मराठी अभ्यास केंद्र

मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या 'मराठी अभ्यास केंद्रा'चे ते सध्या अध्यक्ष आहेत. मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचं हे संघटन आहे.

Dr. Deepak Pawar

लढवली निवडणूक

मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदारकीसाठी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली आहे.

Dr. Deepak Pawar

सरकारचा निर्णय चुकीचा

हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा मुद्द्यावर डॉ. दीपक पवार यांनी सातत्यानं विविध चॅनेलवरुन सरकारचा हा निर्णय कसा चुकीचा आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला.

Dr. Deepak Pawar

राजकीय षडयंत्र

त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठी जनतेवर हिंदी भाषा लादणं यामागं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Dr. Deepak Pawar