Vrushal Karmarkar
ही ऐश्वर्या राय सिनेसृष्टीतील अभिनेत्री नाही, तर बिहारच्या राजकारणात चर्चेत असलेली तेजप्रताप यादव यांची पत्नी आहे.
तेजप्रताप यादव आणि अनुष्का यादव यांच्या संबंधावर ऐश्वर्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. "माझ्या माहितीत ही गोष्ट नव्हती," असे ती म्हणाली.
ऐश्वर्याने आरोप केला की, "लालू यादव यांचं कुटुंब निवडणुकीचं भान ठेवून सगळं नाटक करत आहे."
प्रकरण उघड झाल्यावर राबडी देवी तेजप्रतापकडे गेल्या असाव्यात, आणि "सगळं नीट करेन" असं बोलल्या असतील, असेही ऐश्वर्याने सांगितले.
"फक्त सोशल मीडियावर जाहीर केलं म्हणजे खरंच निलंबन होतं का?" असा प्रश्न ऐश्वर्याने उपस्थित केला.
ऐश्वर्या राय ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. तिने पाटणा आणि दिल्लीतून शिक्षण घेतले आहे, तसेच MBA पूर्ण केले आहे.
आरजेडी प्रमुख लालू यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप आणि ऐश्वर्याचे लग्न २०१८ मध्ये झाले. पण लग्नानंतर काहीच महिन्यांत त्यांच्या नात्यात दुरावा आला.
तेजप्रतापने ऐश्वर्यावर अनेक आरोप केले, तर ऐश्वर्याने अनेकदा माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.
अनुष्का यादव ही तेजप्रताप यादवच्या कथित संबंधांमुळे चर्चेत आली. तिच्यामुळेच ऐश्वर्या आणि तेजप्रतापमधील वाद वाढल्याचे बोलले जाते.