Pranali Kodre
मधुरिमा राजे छत्रपती यांना लहानपणापासूनच त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे.
मधुरिमाराजे या छत्रपती घराण्याच्या सून असून छत्रपती घराण्यातील मालोजीराजे छत्रपती यांच्या त्या पत्नी आहेत.
दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत.
त्यामुळे अगदी दिग्विजय खानवीलकर यांची राजकीय कारकीर्द जवळून पहायला मिळाली.
छत्रपती घराण्यात आल्यानंतर त्यांचा सार्वजनिक वावर आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क याच्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अस सातत्यांने बोलले जायचे दरवेळी त्यांचं नाव चर्चेत येत होतं.
मधुरिमाराजे यांनी सक्रीय राजकारणात यावं यासाठी त्यांचे समर्थक गेल्या 20 वर्षांपासून प्रयत्न करत होते.
दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांना मानणारा एक मोठा गट कोल्हापुरात आहे तसेच छत्रपती घराण्याला मानणा-यांंची संख्याही मोठी आहे.
मालोजीराजे छत्रपती कोल्हापुरातील विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सतत कार्यरत असतात.