संतोष कानडे
धनंजय मुंडे यांची बाजू घेत खून प्रकरणातील आरोपींना सॉफ्ट कॉर्नर देणारे नामदेव शास्त्री हे महंत आहेत
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या भगवान गडाचे हे महंत आहेत
२०१६ मध्ये त्यांनी गडावर राजकीय भाषणं नको, असं म्हणत पंकजा मुंडेंना विरोध केला होता
स्व. गोपीनाथराव मुंडेंचा परंपरेचा दसरा मेळावा, महंत शास्त्रींनी थांबवला
त्यामुळे २०१६ मध्ये पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला होता
शेवटी पंकजा यांना भगवान गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घ्यावा लागला
२०१७ मध्ये पंकजांनी संत भगवानबाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीडच्या सावरगाव येथे भगवान भक्तीगड स्थापन केला
तेव्हापासून आजवर सावरगाव येथेच पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आलेला आहे
मागची अनेक वर्षे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात वितुष्ट होतं
परंतु मागच्या वर्षी नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र दिसले
तेव्हाही नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना अहंकार कमी करण्याचा सल्ला दिला होता
अशा या महंतांनी आता थेट धनंजय मुंडेंचं समर्थन केलं आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे