कोण आहे Payal Kapadia? जिने कान्समध्ये फडकवला भारताला झेंडा

आशुतोष मसगौंडे

विक्रम

चित्रपट दिग्दर्शक पायल कपाडियाने इतिहास रचला. तिच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटासाठी कान्स चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला.

Payal Kapadia | Esakal

गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून कान्समधील मुख्य स्पर्धेसाठी प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Payal Kapadia | Esakal

पायल कपाडियाच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की, 2015 मध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात FTII मध्ये सर्वात मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व पायलने केले होते.

Payal Kapadia | Esakal

संघर्ष

2015 मध्ये, पायल हे FTII मधील 138 दिवसांच्या प्रदीर्घ आंदोलनातील प्रमुख नाव होते. चौहान यांच्याकडे प्रतिष्ठित चित्रपट संस्थेचे अध्यक्ष होण्याची दृष्टी नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.

Payal Kapadia | Esakal

सहकाऱ्यांचे आभार

पायलने कान्स 2024 मध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकल्यानंतर, तिने तिच्या चित्रपटातील महिला नायिका कानी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांचे आभार मानले.

Payal Kapadia | Esakal

राहुल गांधींची पोस्ट

"७७व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकणारे भारतीय तारे!" असे म्हणत राहुल गांधी यांनी प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकल्याबद्दल पायल कपाडिया आणि 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Payal Kapadia | Esakal

मुंबईकर

पायल कपाडियाचा जन्म मुंबईत झाला. पायलच्या आईचे नाव नलिनी मलानी आहे. पायलने आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले.

Payal Kapadia | Esakal

शिक्षण

पायलने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सोफिया कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर पायल कपाडियाने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून दिग्दर्शनाचे कौशल्य आत्मसात केले.

Payal Kapadia | Esakal

विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमधील खेळणार नाही 'हा' सामना?

Virat Kohli | Esakal
आणखी पाहण्यासाठी...