IPL लोगोवरील खेळाडू कोण? त्याचा फोटो देण्याचं कारण काय? जाणून घ्या...

Vrushal Karmarkar

आयपीएल लोगो

आयपीएल लोगो 2008 मध्ये 'UK-based VentureThree' नावाच्या UK-आधारित एजन्सीने डिझाइन केला होता. लोगो हा सिंह, मुकुट, ट्रॉफी आणि फलंदाज यासह अनेक घटकांचे एकत्रीकरण आहे.

IPL LOGO | ESakal

आयपीएल व्हिजन

हा लोगो हा आयपीएलच्या व्हिजनचे परिपूर्ण प्रतिनिधित्व आहे. जो जगभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट टॅलेंटला एका व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी आहे.

IPL LOGO | ESakal

लोगोमधला फलंदाज

आयपीएलच्या लोगोमधला फलंदाज हा वादाचा विषय असला तरी बहुतांश क्रिकेट चाहत्यांनी तो एबी डिव्हिलियर्स असल्याचे मानले आहे. मात्र तसे नाही आहे. तो खेळाडून एबी नसून दुसराच कुणीतरी आहे.

ab de villiers | ESakal

एमएस धोनी

तर काहींचं म्हणणं होतं या लोगोतील खेळाडू एमएस धोनी आहे. मात्र या दोघांपैकी कुणीही यात नाही.

MS Dhoni | ESakal

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सच्या एका शॉटला या लोगो सोबत जोडलं जातं. पण त्याने तो शॉट आयपीएलमध्ये खेळला होता.

ab de villiers | ESakal

लोगोतील खेळाडू

तर दुसरीकडे माहीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा आयपीएल सुरू झालं तेव्हा माहीचे केस लांब होते. यामुळे लोगोतील खेळाडू हा माही नसल्याचं कळतं.

MS Dhoni | ESakal

कारण

तर आता राहिला प्रश्न आयपीएलच्या लोगोमधील तो खेळाडू नेमका आहे तरी कोण? तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. तसेच त्याला निवडण्याचे कारणही सांगतो.

IPL LOGO | ESakal

मार्शफये मोर्तझा

आयपीएलच्या लोगोमधील हा खेळाडू आहे बांगलादेशचा मार्शफये मोर्तझा... तो मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्या अशाच एका शॉटवरून हा लोगो तयार केला आहे.

Marshafaye Mortaza | ESakal

एक शॉट खेळला

2007 च्या विश्वचषक सामन्यादरम्यान मार्शफये मोर्तझाने एक शॉट खेळला होता. तो तेव्हा चर्चेत आला होता.

Marshafaye Mortaza | ESakal

आयपीएल लोगो 2008 पूर्वी तयार

तसेच याबद्दल त्याचे कौतुक झाले. त्यामुळे आयपीएल लोगो 2008 पूर्वी तयार केल्यामुळे हा शॉट डिझाइनसाठी संदर्भ म्हणून वापरला गेला.

IPL LOGO | ESakal