पूनम गुप्ता कोण? थेट राष्ट्रपती भवनात होतंय लग्न

सकाळ ऑनलाईन

राष्ट्रपती भवन म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींचं कार्यालय अन् अधिकृत निवासस्थान आहे.

Rashtrapati Bhavan

खरंतर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या या राष्ट्रपती भवनात काही कार्यक्रमही आयोजित केले जातात.

Rashtrapati Bhavan

पण आता चक्क एक लग्न सोहळा या राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. पण कोणाचं लग्न इथं होणारेय तुम्हाला माहिती आहे का?

Poonam Gupta

तर पूनम गुप्ता नामकं तरुणीचा लग्न सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Poonam Gupta

पूनम गुप्ता ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पीएसओ अर्थात पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर आहे.

Poonam Gupta

पूनमच्या नेतृत्वानं आणि कार्यशैलीनं खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू प्रभावित झाल्या आहेत.

Poonam Gupta

याच पूनम गुप्तानं प्रजासत्ताकदिनी पथसंचलनात सीआरपीएफच्या महिला पथकाचं नेतृत्व केलं होतं.

Poonam Gupta

पूनम गुप्ता जम्मू काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डिप्युटी कमांडंट अविनीश कुमार यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Poonam Gupta

या दोघांचा राष्ट्रपती भवनात होणारा लग्न सोहळा येत्या १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

Poonam Gupta

पण याबाबत अद्याप राष्ट्रपती भवनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Rashtrapati Bhavan