Saisimran Ghashi
29 सप्टेंबर 2008 यादिवशी रात्री 9.35 वाजता मालेगावच्या भिक्खू चौकात भीषण बॉम्बस्फोट झाला.
मृत्यू आणि जखमी
या स्फोटात सहा मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले.
तपासादरम्यान आढळलेल्या पुरव्यांमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह अनेक आरोपींना अटक अटक करण्यात आली
ही केस 17 वर्षे चालली आणि आज 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्यप्रदेशातील चंबल येथे झाला; त्यांचे वडील आरएसएस स्वयंसेवक व डॉक्टर होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेत सक्रियपणे सहभागी होत्या.
स्वामी अवधेशानंद यांच्याकडून संन्यास घेऊन साध्वी प्रज्ञा यांनी राजकारणात प्रवेश केला.
2019 मध्ये त्यांना भाजपाने लोकसभेचे तिकीट दिले, त्या भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या