युक्रेनच्या नव्या पंतप्रधान आहेत झेलेन्स्कींच्या खास, कोण आहेत युलिया?

सूरज यादव

सरकारमध्ये मोठे बदल

रशियासोबत युद्ध सुरू असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी सरकारमध्ये मोठे बदल केले आहेत. झेलेन्स्कींनी माजी अर्थमंत्री युलिया स्विरीडेन्को यांना पंतप्रधान केलंय.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

युलिया नव्या पंतप्रधान

डेनिस शम्यहाल यांना हटवून युलिया यांना पंतप्रधान करण्यात आलंय. डेनिस यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

डेनिस यांचा राजीनामा

पंतप्रधानपदाचा राजीनाम दिल्यानंतर डेनिस यांना संरक्षण मंत्री करण्यात आलंय. २०२० पासून ते पंतप्रधान होते.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

युलिया अर्थतज्ज्ञ

युलिया या एक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी उपपंतप्रधानपदही भूषवलंय. याशिवाय आर्थिक विकास व्यापार मंत्रीही होत्या.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

युद्धकाळात जबाबदारी पेलली

युद्धकाळात त्यांनी युक्रेनची अर्थव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली. तसंच युरोप आणि अमेरिकेकडून मंदत मिळवण्यातही महत्त्वाची भूमकिा बजावली.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

अमेरिकेशी करार

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की खनिज करारासाठी अमेरिकेत गेले असताना त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं. पण युलिया यांनी ट्रम्प यांच्याशी यशस्वी चर्चा करत करार पूर्ण केला होता.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

झेलेन्स्कींच्या मंत्रिमंडळात

युलिया यांना झेलेन्स्कींच्या मंत्रिमंडळात खास जागा आहे. २०२० मध्ये त्या राष्ट्रपतींच्या कार्यालयात उप प्रमुख होत्या. त्यानंतर उपपंतप्रधानही झाल्या.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

ट्रम्प युक्रेनच्या बाजूने

खनिज करारानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूने उभा राहिले.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

कशी होते निवड

युक्रेनमध्ये राष्ट्रपती आणि संसदीय शासन प्रणाली असून जनता राष्ट्रपतींची निवड करते तर पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या प्रस्तावानंतर केली जाते.

who is yulia svyrydenko new ukraine pm | Esakal

गुहेत राहणारी महिला रशियन गुप्तहेर? काय आहे सत्य?

russian woman nina kutina living in gokarna cave | esakal
इथं क्लिक करा