रायगडावरील सिंहासनारूढ शिवपुतळा कोणी बनवलाय? राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाल्यावर...

Amit Ujagare (अमित उजागरे)

ऐतिहासिक सोहळा

१९७४चा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा झाला ही अभिमानास्पद घटना होती.

त्रिशतसांवत्सरीचा योग

१६७४ ते १९७४ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली होती! २ जून १९७४ रोजी रायगडावर हा भव्य सोहळा साजरा झाला.

सिंहासनारूढ शिवपुतळा

याचवेळी रायगडाच्या होळी माळावर शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात आला. हा रायगडावरील पहिला शिवपुतळा होता!

शिल्पकार कोण होते?

शिल्पकार वि. ग. सहस्रबुद्धे यांनी हा पुतळा तयार केला होता. तो ब्रॉन्झमध्ये तयार करून पाच भागांमध्ये गडावर आणण्यात आला. ३० मे १९७४ रोजी सकाळ वृत्तपत्रात आलेले हे छायाचित्र.

पुतळ्याची रचना कशी ठरली?

शिवभक्तांची इच्छा होती की पुतळा मूळ सिंहासनावर असावा. मात्र, पुरातत्त्व खात्याच्या नियमांमुळं तो वेगळ्या ठिकाणी बसविण्यात आला.

गो. नी. दांडेकरांची भूमिका

या सोहळ्यात गो. नी. दाण्डेकर यांची भूमिका विशेष होती. महाराष्ट्र शासनाने या सोहळ्यासाठी विशेष समिती नेमली होती.

कोण होते उपस्थित?

मुख्यमंत्री वसंतराव नाईक, बांधकाम मंत्री अंतुले व केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

पावसातही उत्साहात!

कोसळणाऱ्या पावसामुळं अडचणी येत होत्या, तरीही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

विशेष टपाल तिकीट

२ जून १९७४ रोजी शिवराज्याभिषेकाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट व इतिहासावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

इतिहासात कोरलेला क्षण

शिवराज्याभिषेकाच्या तीनशे वर्षांच्या पूर्णत्वाच्या या क्षणी सिंहासनारूढ शिवपुतळा रायगडावर उभा राहिला. हे होतं स्वाभिमानाचं खरं दर्शन!