Saisimran Ghashi
उन्हाळ्यात सर्वजण आवडीने थंडपेये पितात.
अशात स्वस्तात मस्त आणि आरोग्यदायी पेय लिंबू पाणी/लिंबू सरबत.
पण काही लोकांनी लिंबू पाणी पिणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते.
ज्यांना GERD ही पचनासंबंधी त्रास असतो आणि अन्ननलिकेच्या वरच्या भागात आम्ल येण्याची समस्या असते, त्यांना लिंबू पाणी पिणे टाळावे.
लिंबू पाणी जास्त पिणे दातांच्या इनेमलला नुकसान पोहोचवू शकते, विशेषत: जे लोक दातांच्या समस्यांचा सामना करत आहेत अशा लोकांनी लिंबू पाणी टाळावे.
पोटाचे अल्सर असलेल्या लोकांना लिंबू पाणी पिऊ नये कारण ते पचनसंस्थेवर अधिक ताण आणू शकते.
या समस्या असल्यास तुम्ही लिंबू पाणी पिणे टाळा कारण तुमच्या शरीराला जास्त त्रास होऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.