सकाळ डिजिटल टीम
उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे डायबिटीज रुग्णांना रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढू शकतं.
कॅलोरी जास्त असल्यामुळे, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस टाळावा.
उसाचा रस जास्त पिल्याने गॅस, एसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
कावीळ किंवा यकृताच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस पिणं टाळा, कारण यामुळे तणाव येऊ शकतो.
उसाचा रस शरीराला थंडावा देतो, पण सर्दी किंवा इन्फेक्शन असताना प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
उसाच्या रसामध्ये पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.
काही लोकांना उसाच्या रसामुळे एलर्जी होऊ शकते, ज्यामुळे स्किनवर पिंपल्स किंवा खाज सुटू शकते. त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेत जा.