सकाळ डिजिटल टीम
फणस रक्तातील साखरेची पातळी कमी करतो. ज्यांची शुगर लेव्हल आधीच कमी आहे, त्यांनी याचे सेवन करू नये.
अपचन होत असेल तर फणस खाऊ नये . फणसामुळे काही लोकांना पोटदुखी, उलट्या, गॅस आणि अपचन होऊ शकते.
फणस खाल्ल्याने काही लोकांना त्वचेवर पुरळ, खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो.
गरोदरपणात फणस टाळा फणसाची उष्ण प्रकृती गरोदर महिलांसाठी हानिकारक ठरू शकते.
कमी रक्तदाब असलेल्यांनी खबरदारी घ्यावी . फणस रक्तदाब आणखी कमी करू शकतो, ज्यामुळे चक्कर येण्याचा धोका वाढतो.
अन्नामुळे अॅलर्जी झाल्याचा इतिहास असल्यास, फणसामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
ऑपरेशननंतर फणस खाणे टाळा माहिती: सर्जरीनंतर फणस जड पडू शकतो आणि पाचन तंत्रावर ताण आणू शकतो.
फणस आणि औषधे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे . काही औषधांवर फणसाचा विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणून औषध घेत असाल तर फणस खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.