Yashwant Kshirsagar
जगभरात कॉफी हे सर्वात प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडीचे पेय आहे.
अनेक लोकांची सकाळ ही कॉफीने पिण्याने होते. हे एनर्जी बुस्टर पेय मानले जाते.
पण कॉफी अनेक लोकांसाठी फायदेशीर असू शकत नाही. काही लोक कॉफी प्यायले तर अनेक प्रकारचा त्रास होऊ शकतो.
चला तर मग कोणी-कोणी कॉफीचे सेवन करु नये याबाबत जाणून घेऊया.
गर्भवती महिलांनी कॉफी आजिबात पिऊ नये. कॉफीमधील कॅफेन हे प्लेसेंटा द्वारे पोटातील बाळापर्यंत पोहचू शकतात.
याशिवाय गर्भावस्थेमध्ये कॉफी प्यायल्याने मिसकॅरेज, प्री-मॅच्युअर डिलिव्हरी किंवा बाळाचे वजन कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
ज्या लोकांना हृदयरोगाचा त्रास आहे त्यांनी कॉफी पिणे टाळावे, कारण यामुळे हृदयावर जास्त दबाव वाढू शकतो.
कॉफीतील कॅफेन हृदयाची गती आणि रक्तदाब देखील वाढवू शकते.
इमसोम्निया किंवा झोपेसंबंधी समस्या असलेल्या लोकांनीही कॉपी पिणे टाळावे.
ताणाचा किंवा पोट फुगण्याचा त्रास असलेल्या लोकांनीही कॉफी आजिबात पिऊ नये.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.