बाबासाहेबांना प्रत्येक कठीण प्रसंगात साथ देणारा 'बॉडीगार्ड' कोण होता?

Amit Ujagare (अमित उजागरे)

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्यात सामाजिक लढाई लढताना अनेक बाके प्रसंग आले, पण त्यांचा बॉडीगार्ड कायम त्यांच्या पाठीशी उभा होता.

Dr. Babasaheb Ambedkar

बॉडीगार्ड कोण?

बाबासाहेबांचा हा बॉडीगार्ड व्यक्ती कोण होता? तुम्हाला माहितीए का? नसेल तर जाणून घेऊयात.

Dr. Babasaheb Ambedkar

निधड्या छातीचा

अशिक्षित परंतू प्रचंड संघटन कौशल्य अन् बाबासाहेबांच्या चळवळीवर मोठी निष्ठा असलेली ही व्यक्ती. स्वतः कोणालाही न घाबरणारा हा निधड्या छातीचा, धडाडीचा, करारी नेता होता.

Dr. Babasaheb Ambedkar

अशिक्षित पण प्रगल्भ

ही व्यक्ती अशिक्षित असली तरी त्यांची विचारसरणी अत्यंत प्रगल्भ व पुरोगामी होती. त्यांची रहाणी अत्यंत साधी पण टापटीप, डोक्यावर मखमलीची टोपी, धोतर अन् पायात मोजे व बूट असा त्यांचा पेहराव होता.

Dr. Babasaheb Ambedkar

सावलीसारखा उभा

गांधीसोबतच्या पुणे कराराच्या वाटाघाटी दरम्यान बाबासाहेबांना धमक्यांची पत्रं यायची पण तरीही न डगमगता ते काम करत होते. यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांचा बॉडीगार्ड सावलीसारखा उभा होता.

Dr. Babasaheb Ambedkar

मडके बुवा

गणपत महादेव जाधव ऊर्फ 'मडके बुआ' असं बाबासाहेबांच्या बॉडीगार्डचं नाव. ते उत्कृष्ट मॅकेनिक होते, त्यामुळं गोऱ्या साहेबांनी त्यांना १९२८ मध्ये अफ्रिकेला नेलं पण त्यांच्याशी न पटल्यानं ते पुन्हा भारतात परतले.

Madke Bua_ Dr. Babasaheb Ambedkar

माळकरी व्यक्ती

भारतात आल्यानंतर त्यांनी मडकी विकण्याचा धंदा सुरु केला, त्यावरुनच त्यांना 'मडके बुवा' असं टोपण नाव पडलं. माळकरी असल्यानं त्यांना आधीच बुवा म्हणून संबोधलं जायचं.

Dr. Babasaheb Ambedkar

निधन कधी?

बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाआधीच २८ मार्च १९२८ रोजी मुंबईतील राहत्या घरी ६९ व्या वर्षी हृदविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

Dr. Babasaheb Ambedkar

संदर्भ काय?

लेखक विजय सुरवाडे लिखित 'समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात हा संदर्भ देण्यात आला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar