सकाळ ऑनलाईन
दिशा सालियान हे नाव सध्या बातम्यांमुळं चर्चेत आहे. पण ती कोण होती? हे तुम्हाला माहिती आहे का?
दिशा सालियान ही सेलिब्रेटी मॅनेजर होती. मालाडमध्ये १४ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्यानं ती चर्चेत आली होती. मृत्यूवेळी ती २८ वर्षांची होती.
सुशांत सिंह राजपूतपूर्वी तिनं ऐश्वर्या रॉय, वरुण शर्मा, भारती सिंह, रिया चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून काम केलं होतं.
दिशा दादर इथं आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. कोविडच्या काळात तिचा भावी पती अभिनेता रोहन रॉयही त्यांच्यासोबत राहत होता.
रोहन रॉयनं मालाडमधील एका सोसायटीत १४ व्या मजल्यावर फ्लॅट घेतला होता. लग्नानंतर ते या घरात राहायला जाण्याचा विचार करत होते. याच फ्लॅटमधून पडून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.
दिशाच्या मृत्यूनंतर रोहन रॉयनं आपली सहकलाकार अभिनेत्रीसोबत लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
दिशा ही मुळची कर्नाटकमधील उडुपीची रहिवासी होती. तिनं बॅचलर ऑफ मास मीडियाची डिग्री घेतली होती. २६ मे १९९२ रोजी तिचा जन्म झाला होता.
मृत्यू समयी तिची एकूण संपत्ती ६ कोटी रुपये इतकी होती.