कोण आहेत विजय हजारे, ज्यांच्या नावाने भारतात होते वनडे स्पर्धा

Pranali Kodre

विजय हजारे ट्रॉफी

भारतात ज्या मुख्य देशांतर्गत स्पर्धा होतात, त्यातील एक स्पर्धा म्हणजे विजय हजारे ट्रॉफी. वनडे प्रकाराक ही स्पर्धा खेळली जाते.

Vijay Hazare Trophy | Sakal

विजय हजारे कोण?

२००२ मध्ये विजय हजारे यांचे नाव भारताच्या देशांतर्गत वनडे स्पर्धेला देण्यात आले. पण या स्पर्धेला ज्यांचं नाव दिलं गेलं आहे, ते विजय हजारे कोण होते माहित आहे का?

Vijay Hazare Trophy | Sakal

सांगलीत जन्म

११ मार्च १९१५ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जन्म झालेल्या विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Vijay Hazare | Sakal

भारतासाठी कामगिरी

विजय हजारे यांनी ३० कसोटी सामने भारताकडून खेळले, ज्यात ४७.६५ च्या सरासरीने ७ शतकांसह २१९२ धावा केल्या. त्यांनी १४ सामन्यात भारताचे नेतृत्वही केले.२

Vijay Hazare | Sakal

प्रथम श्रेणीतील फलंदाजी

त्यांनी २३८ प्रथम श्रेणी सामने खेळताना ६० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावा केल्या.

Vijay Hazare | Sakal

मोठे विक्रम

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये सध्या ते टॉप १० खेळाडूंमध्येही आहेत. तसेच सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्येही ते पहिल्या १० मध्ये ते आहेत.

Vijay Hazare | Sakal

दुसऱ्या महायुद्धादरम्यान क्रिकेट

त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० द्विशतकेही केली, ज्यातील ६ त्यांनी दुसरं महायुद्ध सुरू असताना ठोकली होकी. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धावेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय क्रिकेट खेळणारा भारत एकमेव देश होता.

Vijay Hazare | Sakal

ब्रॅडमन यांनाही केलंय बाद

विजय हजारे यांनी केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही छाप पाडली आहे. त्यांनी ब्रॅडमन यांनाही बाद केलं आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५९५ विकेट्स घेतल्या.

Vijay Hazare | Sakal

पद्मश्री पुरस्कार

त्यांना १९६० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले.

Vijay Hazare | Sakal

विराट अन् रोहित - चार ICC स्पर्धा जिंकणारे दोन भारतीय

Rohit Sharma - Virat Kohli ICC Victory | Sakal
येथे क्लिक करा