Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला.
या घराण्याचे मूळ पुरुष सुजनसिंह हे उदयपूरच्या शिसोदे राजघराण्यातील होते.
ते इ.स. १३३४ च्या सुमारास आपले नशीब आजमावण्यासाठी उत्तरेहून दक्षिणेकडे आले.
व बहामनी घराण्याच्या संस्थापक हसनगंगू यांच्या सेवेत त्यांनी चाकरी स्वीकारली.
हसनगंगूचा पराभव करण्यासाठी बादशहा महंमद तुघलक यांनी इ. स. १३४६ मध्ये दिल्लीहून दक्षिणेकडे स्वारी केली.
त्या दोघांमध्ये झालेल्या संघर्षात सुजनसिंह आणि त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी अपार शौर्य गाजवले.
इ. स. १३४७ मध्ये हसनगंगूने अल्लाउद्दीन बहमन हे नाव घेतले आणि गुलबर्गा येथे बहामनी साम्राज्याची स्थापना केली.
तेव्हा त्यांनी सुजनसिंहास देवगिरी प्रांतातील दहा गावे जहागीर म्हणून प्रदान करून मोठ्या सरदारीचा मान दिला.
पुढे बहामनी राज्यात सुजनसिंहाच्या कुटुंबाचा उत्कर्ष वाढत गेला.
सुजनसिंह इ. स. १३५५ मध्ये निधन पावले.
त्यांचे पुत्र दिलीपसिंह हे कुटुंबाचे प्रमुख झाले.
दिलिपसिंहांचा पुत्र सिद्धजी हा कुशल आणि पराक्रमी होता. त्यांनी बहामनी सत्तेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यांचा पुत्र भेरवसिंह ऊर्फ भोसाजी यांच्या काळापासून या घराण्यात "भोसले" हे उपनाव प्रचलित झाले. भोसाजींचे वंशज भोसले म्हणून ओळखले जातात.
ही माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवकाल ग्रंथात दिली गेली आहे.