Mansi Khambe
ऑफिस, पार्टी किंवा आऊटिंगसाठी बाहेर पडताना आपण कपड्यांपासून ते मेकअपपर्यंत सगळं परफेक्ट करतो. तसेच व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी महागडे, ब्रँडेड परफ्युमही वापरतो.
Perfume Fragrance
ESakal
परफ्यूमच्या बाटलीतून येणारा सुगंध कसा तयार केला जातो? सुगंध तयार करण्यासाठी परफ्यूममध्ये अल्कोहोल मिसळले जाते का? कंपन्या असे का करतात, याबाबत जाणून घ्या.
Perfume Fragrance
ESakal
अल्कोहोलमुळे असतो, सुगंधामुळे नाही. बहुतेक परफ्यूममध्ये ७० ते ९० टक्के अल्कोहोल असते, पण प्रश्न हा आहे की कंपन्या असे का करतात.
Perfume Fragrance
ESakal
परफ्यूमच्या बाटलीतून येणाऱ्या सुगंधामागील सर्वात मोठा घटक म्हणजे स्वतः सुगंध नसून, त्यातील अल्कोहोल आहे. बहुतेक परफ्यूममध्ये ७० ते ९० टक्के अल्कोहोल असते.
Perfume Fragrance
ESakal
परफ्यूम सुगंधित तेल, अल्कोहोल आणि थोडे पाणी या तीन घटकांचे मिश्रण आहे.
Perfume Fragrance
ESakal
परफ्यूममध्ये विविध प्रकारची सुगंधित तेल आणि इतर पदार्थ असतात. हे सुगंधी घटक विरघळवण्यासाठी परफ्यूममध्ये प्रामुख्याने अल्कोहोलचा वापर केला जातो.
Perfume Fragrance
ESakal
एकसमान मिश्रण तयार करण्यासाठी हे घटक योग्य प्रमाणात मिसळणे आवश्यक असते. या प्रक्रियेसाठी इथेनॉल, किंवा इथाइल अल्कोहोल महत्त्वाचे असते.
Perfume Fragrance
ESakal
तसेच परफ्यूम लावताच त्याचा सुगंध पसरतो, याचे एक कारण म्हणजे अल्कोहोलचे वेगाने होणारे बाष्पीभवन. यामुळे सुगंधी घटकांना हवेत पसरण्यास मदत होते.
Perfume Fragrance
ESakal
परफ्यूमचा सुगंध काही तास तसाच राहीलच असे नाही. सुरुवातीला, हलके सुगंधी घटक अधिक जाणवतात. हे बाष्पीभवन झाल्यावर, इतर सुगंधांचे अंश समोर येतात. हे परफ्यूममध्ये वापरलेल्या सुगंधी घटकांवर अवलंबून असते.
Perfume Fragrance
ESakal