इराणमध्ये जन्मलेल्या अनारकलीची समाधी लाहोरमध्ये कशी?

Payal Naik

मुगलेआझम – केवळ चित्रपट नव्हे!

मुगलेआझममधील अनारकलीची कथा केवळ काल्पनिक नाही, तिचा खरा इतिहास लाहोरच्या किल्ल्यात आजही जिवंत आहे.

anarkali | esakal

सलीमचा जन्म

अकबराने अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्याकडे मागितलेल्या नवसानंतर सलीमचा जन्म झाला.

anarkali | esakal

इराणची सौंदर्यवती – नादिरा

अनारकलीचे खरे नाव नादिरा बेगम किंवा शरफुन्निसा होते. ती इराणमधून एका व्यापारी ताफ्यासह लाहोरला आली होती.

anarkali | esakal

अकबराला आवडलेले नृत्य

नादिरा एक उत्कृष्ट नृत्यांगना होती. तिचे नृत्य अकबराला खूप आवडले आणि त्यानेच तिला 'अनारकली' हे नाव दिले.

anarkali | esakali

सलीम आणि अनारकलीचे प्रेम

शहजादा सलीम आणि अनारकली यांच्यात हळू हळू प्रेमसंबंध निर्माण झाले. अकबराला हे पसंद नव्हते.

anarkali | esakal

प्रेमासाठी शिक्षा – जिवंत दफन!

त्यांच्यावर अंकुश न ठेवता आल्याने संतप्त अकबराने अनारकलीला लाहोर किल्ल्याच्या भिंतीत जिवंत पुरण्याचा क्रूर आदेश दिला.

anarkali | esakal

प्रेमाची अमर निशाणी – कब्र

जेव्हा सलीम सम्राट जहांगीर बनला, तेव्हा त्याने अनारकलीच्या अवशेषांना बाहेर काढून लाहोरमध्ये तिची सुंदर समाधी बांधली.

anarkali | esakal

ऐतिहासिक पुरावे

ब्रिटिश प्रवासी विल्यम फिंच आणि टेरी यांनीही अनारकलीच्या मृत्यूची नोंद आपल्या लेखनात केली आहे.

anarkali | esakal

कब्रेतील बदल

शिखांचे राज्य असताना ही कबर एका जनरलचे निवासस्थान बनली. त्यानंतर इंग्रजांनी तिचे चर्चमध्ये रूपांतर केले.

anarkali | esakal

वर्तमान स्थिती – अनारकलीचे स्मारक

आजही लाहोरमधील पंजाब सिव्हिल सचिवालयाच्या आवारात अनारकलीचा मकबरा (कब्र) अभिलेखागार (Records office) म्हणून वापरला जातो.

anarkali | esakal

भरत जाधव यांना सगळ्यात जास्त आवडते कोल्हापुरमधील 'ही' गोष्ट

bharat jadhav | esakal
येथे क्लिक करा