Mansi Khambe
रेल्वेच्या रुळांवर दगड पसरल्याचे दिसून येते. या दगडांना तांत्रिक भाषेत 'बॅलास्ट' (Ballast) किंवा खडी म्हणतात. रुळांवर हे दगड का टाकले जातात आणि यामागचं कारण काय, जाणून घ्या.
Railway Track Ballast
ESakal
कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती उभी राहू शकत नाही, तसेच रेल्वे रुळांवर टाकलेले दगड रेल्वे रुळांची मजबुती, स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी टाकले जातात.
Railway Track Ballast
ESakal
रेल्वे रुळांवर टाकलेले दगड म्हणजेच 'बॅलास्ट' हे रुळाच्या भक्कम पायाचे काम करतात.
Railway Track Ballast
ESakal
रेल्वेचे रूळ ज्या लोखंडी पट्ट्यांपासून बनतात, त्या सिमेंट किंवा लाकडाच्या आडव्या खांबांवर टेकवल्या असतात. हे स्लीपर्स जमिनीवर स्थिर ठेवण्याचे काम रूळांवरील दगड करतात.
Railway Track Ballast
ESakal
रेल्वे रुळावरून जात असताना हे दगड गाडीच्या वजनाला एका बिंदूवर केंद्रित होऊ न देता समान रीतीने पसरवतात. यामुळे जमिनीवर एकाच ठिकाणी दाब पडत नसून रुळांची रचनाही सुरक्षित राहते.
Railway Track Ballast
ESakal
जर हे दगड नसतील, तर गाड्यांच्या वजनामुळे रूळ जमिनीमध्ये धसू शकतात किंवा त्यांची दिशा बदलू शकते. रूळांवरील या दगडांमुळे रेल्वे रूळ कधीच सरकत नाहीत.
Railway Track Ballast
ESakal
पावसाळ्यात रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे रुळांखालील माती भुसभुशीत होऊन रूळ खचण्याची भीती असते. यामुळे रुळांवरील दगडांच्या पोकळीमुळे पावसाचे पाणी जमिनी खाली निघून जाते.
Railway Track Ballast
ESakal
बैलास्टसाठी वापरले जाणारे दगड खडबडीत आणि अणकुचीदार असतात. ते एकमेकांमध्ये घट्टन बसतील, अशापद्धतीने दगडांची रचना केलेली असते.
Railway Track Ballast
ESakal
कालांतराने या दगडांमध्ये धूळ किंवा कचरा साचल्याने पाणी निचरा होण्यास अडथळा येतो. त्यामुळे रेल्वे विभागाकडून नियमितपणे या दगडांची तपासणी केली जाते.
Railway Track Ballast
ESakal
Airplane Lights
ESakal