Amit Ujagare (अमित उजागरे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक बैठक पक्की होती. जे जे समाजहिताचं ते ते त्यांनी अनुसरलं.
याच धर्तीवर त्यांचा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी देखील खास असं नातं होतं.
डॉ. आंबेडकर संतवचनांचा अर्थपूर्ण उपयोग आपल्या लिखाणात करत. तुकारामांच्या अभंग पंक्ती त्यांच्या अनेक लेखात विखुरलेल्या दिसतात.
वारकरी परंपरा ही समताधिष्ठित होती. त्यामुळं आंबेडकरांनी लोकशिक्षण आणि लोकजागृती या गोष्टींना महत्व दिलं होतं.
लोकशिक्षणासाठी त्यांनी मूकनायकचं बिरुद संत तुकाराम महाराजांचं निवडलं होतं. तर बहिष्कृत भारतसाठी त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील मजकूर निवडला.
बाबासाहेबांनी आपल्या भूमिकेचं समतेचं तत्व, संत साहित्य आणि संत परंपरेचा गौतम बुद्धाशी असलेला वैचारिक संबंध अशा तीन पद्धतीनं विवेचन केलं आहे.
देहूरोड इथं बुद्ध मुर्तीची स्थापना करताना त्यांनी देहूच्या परिसरात बुद्धाची प्रतिकं दिसतात, त्यामुळं हा परिसर बुद्धाशी नातं जोडणारा आहे, हा लक्षवेधी विचार त्यांनी मांडला होता.
आंबेडकरांनी संत साहित्य आणि संतांचं जातसंस्थाविषयक तत्व यामध्ये फरक केला. संतसाहित्यातील लोकशिक्षणाचा भाग त्यांनी स्विकारला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतीक मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात हे संदर्भ देण्यात आले आहेत.