तीव्र उतारावर ब्रेक फेल का होतात? तुम्हाला हे माहिती असायलाच हवं

सकाळ डिजिटल टीम

नवले पूल अपघात

पुण्यात कात्रजच्या बोगद्यापासून नवले पुलापर्यंत साधारण १० किलोमीटरचा तीव्र उतार आहे. या पट्ट्यात गेल्या काही वर्षांत अनेक अपघात जड वाहनांमुळे आणि उतार उतरताना ब्रेक निकामी होऊन झाले आहेत.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

ब्रेकची ताकद

वाहनांना जास्त ताकदीचे इंजिन देताना त्याप्रमाणात ब्रेकची ताकद वाढवली जात नाही. अपुऱ्या क्षमतेचे 'फेल-सेफ' वाहनांवर असणे.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

ब्रेक तापतात

उतारावर प्रभावी इंजिन ब्रेक आणि रिटार्डर ब्रेक जास्त तापू न देण्याचे काम करतात. कायद्याने सक्ती केल्यानंतर अंमलबजावणी झालीय. पण त्यापूर्वी विकलेल्या वाहनांना ही उपकरणे नाहीत.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

ब्रेक निकामी होतात

जास्त तापलेल्या ब्रेकमध्ये ड्रम प्रसारण पावून ऑटो अडजेस्टर व चेंबरच्या क्षमतेबाहेर परिस्थिती निर्माण होऊन ब्रेक निकामी होतात. या क्षमता वाढवणे गरजेचे आहे. अपघातानंतर थंड झालेल्या ब्रेकची तपासणी केल्यास सर्व ठीक असल्याचं दिसतं.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

वाहनांचं टेस्टिंग

वाहन उत्पादक दीर्घ उतारांवर कुठल्याही प्रकारचे टेस्टिंग करत नाहीत. कारण, वाहनविषयक कायदा त्यांना तशी सक्ती करत नाही. त्यामुळे सदोष वाहन सरळ रस्त्यावर येते.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

भारतात अजूनही ड्रम ब्रेक

सर्व जगभरातील वाहन उत्पादक डिस्क ब्रेकवर कधीच रूपांतरित झाले आहेत, जे ड्रम ब्रेकपेक्षा फार सुरक्षित असतात. भारतात ५०-६० वर्षांपूर्वी प्रचलित असलेले ड्रम ब्रेक अजूनही तशाच स्वरूपात बनवून वाहने विकतात.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

इतर कारणे

उतारावर जास्त वेगात वाहन घरंगळत नेणे. जास्त वाहनाच्या क्षमतेपेक्षा भार वाहून नेणे व वाहन उत्पादकांनी त्या अनुरूप चॅसी व पाटे देणे. उच्च गिअरमध्ये चालविणे. कुठलेही ब्रेक लायनर वापरणे. उतारापूर्वी ब्रेकच्या टाकीतील दाब कमी दिसल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करणे.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal

उपाय काय?

भारतीय वाहन उद्योजकांना या विषयावर संवेदनशील बनविणे. त्या अनुषंगाने वाहनविषयक कायदा बदलणे. वाहनचालकांचे नियमित प्रशिक्षण व स्वयंशिस्त. उतारावर जड वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवून त्यात लहान वाहनांनी न जाणे.

Why Brakes Fail on Steep Descents

|

Esakal