Amit Ujagare (अमित उजागरे)
बलुचिस्तानची मुळे भारताच्या फाळणीशी संबंधित आहेत. संस्थानांना भारत वा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता.
कलातचे शासक मीर अहमद खान यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. कलात ही बलुचिस्तानातील प्रमुख रियासत होती.
११ ऑगस्ट १९४७ रोजी मुस्लिम लीग आणि कलात यांच्यात स्वाक्षरी झाली. यात कलात हे भारतीय राज्य नसल्याचे मान्य करण्यात आले होते.
१ एप्रिल १९४८ रोजी पाकिस्तानी सैन्याने कलातवर आक्रमण केले. खान ऑफ कलातने आत्मसमर्पण केले आणि कलात पाकिस्तानात विलीन झाले.
खानचा भाऊ प्रिन्स अब्दुल करीमने पहिले बंड उभारले. त्यानंतर नवाब नवरोज खानने नेतृत्व घेतले, परंतु त्याला अटक झाली. त्याचे नातेवाईक फासावर गेले.
१९५५ मध्ये अयुब खानने बलुचिस्तानसह संपूर्ण पश्चिम पाकिस्तान एकत्र केले. बलुचांच्या स्वायत्ततेवर गदा आली आणि विरोध वाढला.
१९७३ मध्ये पाकिस्तानने बलुच सरकार बरखास्त केले. जनरल टिक्का खानने लष्करी कारवाई केली. ८० हजार सैनिक, हवाई हल्ले आणि हजारो मृत्यू.
बलुच स्वतःला स्वतंत्र, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळं मानतात. बलुच आंदोलन अजूनही सुरूच आहे. अफगाणिस्तानातही अनेक नेते निर्वासित.
बलुच जनतेला वाटतं की जसा हस्तक्षेप भारताने बांगलादेशच्या वेळी केला, तसा बलुचिस्तानसाठीही करावा.
११ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तानने बलुचिस्तानच्या स्वतंत्रतेची मान्यता दिली होती. आजही बलुच लोक हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करतात.