Apurva Kulkarni
सलमान आणि ऐश्वर्या यांचं नातं का तुटलं याबाबत जेष्ठ पत्रकार हनिफ झवेरी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरच्या चर्चा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटापासून सुरू झाल्या होत्या.
चाहत्यांना सलमान-ऐश्वर्या एकत्र आवडायचे आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा त्यावेळी सलमान-ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते.
सलमान ऐश्वर्याच्या नात्याबद्दल चाहत्यांच्या मनात फार उत्सुकता होती. परंतु दोघांचं नातं का तुटलं हे तुम्हाला माहित आहे का?
ऐश्वर्याचे आई-वडील सलमानच्या एक्स रिलेशनशिप्समुळे काहीसे नाराज होते.
त्याकाळी सलमानचं नाव सोमी अली आणि संगीत बिजलानी यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं.
त्यामुळे सलमान खान हा ऐश्वर्याच्या प्रेमात नसून दोघांचं हे रिलेशनशिप नाममात्र आहे असं ऐश्वर्याच्या पालकांना वाटत होतं.
सलमान ऐश्वर्यासोबत फक्त फ्लर्ट करतोय असं ऐश्वर्याच्या पालकांना वाटायचं परंतु सलमानला ऐश्वर्याशी लग्न करून आपलं आयुष्य सेट करायचं होतं