Amit Ujagare (अमित उजागरे)
अरेंज मॅऱेजमध्ये मुलं-मुली पाहणं हे आपल्याकडं सर्रास केलं जातं. लग्नापूर्वी त्यांची वयं तसंच दिसणं या गोष्टी महत्वाचा ठरतात. पण तरीही सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांशी सुंदर मुलींनी लग्न केल्याचं दिसून येतं. पण असं का होतं? जाणून घेऊयात.
अनेकदा एखादी सुंदर मुलगी एखाद्या सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलाच्या हातात हात घालून फिरताना तुम्हाला दिसल्यास तुम्ही आश्चर्यचकीत होऊन जाता.
अशा वेळी हँडसम आणि चार्मिग दिसणाऱ्या मुलांच्या मनात असा विचार जरुर आला असेल की या मुलामध्ये नेमकं असं काय आहे जे माझ्यात नाही.
पण खरंतर मुलं आपल्यासाठी सुंदर दिसणारी मुलगीच शोधत असतात. तर मुलींचं बरोबर या उलट असतं.
मुलींना कायम 'रफ अँड टफ' मुलं आवडतात. तसंच त्यांना अशी मुलंच आपला जीवनसाथी असावा असं वाटतं. त्याचबरोबर मुलाचा मनमिळावू स्वभाव आणि टॅलेंट यामुळंही सर्वसाधारण मुलं मुली निवडत असाव्यात.
म्हणजेच जर मुलगा सर्वसाधारण दिसत असला तरी त्याच्यामध्ये जर मन जिंकून घेण्याची कला असेल तर त्याचीच निवड करतात, मग तो रंगानं कसाही असू द्या.
त्याचबरोबर मुलींना वयानं मोठे आणि मॅच्युअर मुलंही आवडतात. कारण त्यांना असं वाटतं असतं की या मुलानं आपल्याला वेळ द्यावा आणि समजून घ्याव.
तसंच सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांमध्ये हँडसम मुलांइतका इगो कदाचित नसतो तसंच त्यांना कुठल्याही गोष्टीची असुरक्षितता वाटत नाही. त्यामुळं त्यांच्यामध्ये बोल्डनेस असतो.